मुंबईत उघडलं भारतातील पहिलं Apple Store..! जाणून घ्या या स्टोअरची वैशिष्ट्ये

Apple Store खूप खास असेल कारण ते पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालेल. यासाठी कंपनीकडून सोलर पॅनलही बसवण्यात आले आहेत.

Apple BKC मध्ये ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी 100 कर्मचारी असतील आणि ते 20 वेगवेगळ्या भाषा बोलू शकतील.

या स्टोअरमध्ये ग्राहकांना अॅपल पिकअप सेवाही दिली जाणार आहे. म्हणजेच ग्राहक घरबसल्या ऑर्डर करू शकतात आणि अॅपल स्टोअरमध्ये येऊन पिकअप करू शकतात

अॅपलच्या स्टोअरची रचना मुंबईतील प्रसिद्ध काळ्या-पिवळ्या टॅक्सींवर आधारित आहे.

 Apple ने भारतात 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत कंपनीचे हे रिटेल स्टोअर खूप खास आहे.

अॅपलसाठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाची बनली आहे, कारण ही काही मोजक्या बाजारपेठांपैकी एक आहे जिथे कंपनीचा महसूल दुहेरी अंकात वाढत आहे.

मुंबईनंतर अॅपलचे दुसरे स्टोअर दिल्लीतील साकेत येथे 20 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. अॅपलच्या दोन्ही स्टोअरमध्ये ग्राहकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी