कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांनी उसाचा रस पिऊ नये. उसाच्या रसात आढळणाऱ्या पॉलिकोसॅनॉलचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पोटदुखीसोबत डायरियाची समस्याही उद्भवू शकते.
तुमच्या वाढत्या वजनाने तुम्ही आधीच हैराण असाल तर अशा परिस्थितीत उसाचा जास्तीचा रस पिणे टाळा. उसाचा रस प्यायल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
सर्दी-खोकल्याचा त्रास होत असला तरीही उसाचा रस पिणे टाळावे. उसाच्या रसाच्या थंड परिणामामुळे सर्दी आणि खोकला होऊ शकतो. उसाचा रस प्यायल्याने व्यक्तीला घसा खवखवणे, श्लेष्मा स्राव इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.