चेहऱ्यावर चुकूनही लावू नका स्वयंपाकघरातील 'या' वस्तू चेहरा होईल खराब 

घरगुती उपचार कधीकधी प्रभावी असतात. विशेषत: त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. पण स्वयंपाकघरात ठेवलेल्या सर्व वस्तू तुमच्या त्वचेसाठी योग्य असतीलच असे नाही. 

काही गोष्टी थेट चेहऱ्यावर किंवा हात-पायांच्या त्वचेवर लावू नये. अन्यथा, त्वचेवर लालसरपणा, पुरळ, कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

बेकिंग सोडा पिठ फ्लॉपी करण्यासाठी  तसेच स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते. परंतु काही लोक टॅनिंग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा थेट त्वचेवर लावतात. असे केल्याने त्वचेवर रॅशेस आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. बेकिंग सोडा त्वचेची पीएच पातळी खराब करतो. त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल कमी होते.

ऍपल सायडर व्हिनेगर हे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. जर जास्त प्रमाणात व्हिनेगर थेट त्वचेवर लावले तर ते त्वचेची पीएच पातळी खराब करते. तसेच त्वचा अधिक एक्सफोलिएट होते. त्यामुळे त्वचेमध्ये जळजळ आणि कोरडेपणा येतो.

टूथपेस्टचा वापर घरगुती उपचारांमध्येही केला जातो आणि त्याच्या मदतीने मुरुमे कमी होतात. पण जर टूथपेस्ट जास्त वेळ लावली किंवा रात्रभर तशीच राहिली तर त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्वचेवर जास्त काळ कोणतेही उत्पादन लावू नका.

लिंबू सायट्रिक ऍसिडचा स्रोत आहे. ते आम्लयुक्त असल्याने, ते थेट त्वचेवर लावल्यास ते पीएच पातळीला त्रास देऊ शकते. त्यामुळे लालसरपणा,आणि कोरडेपणा येऊ शकतो.

उन्हाळ्यात रोज जेवणासोबत कांदा खाण्याचे फायदे, जाणून घ्या!