मेटा मालकीच्या इंस्टाग्रामने ट्विटरला टक्कर देण्यासाठी नवीन अॅप थ्रेड्स (Threads) लॉन्च केले आहे.

थ्रेड्समध्ये इन्स्टाग्रामचे काही फिचर्स जोडण्यात आले आहेत. ट्विटर पेड झाल्यानंतर, लोकांनी स्वतःला ट्विटरपासून दूर केले.

यूजर्स थ्रेड्सवर जास्तीत जास्त 500 कॅरेक्टरची पोस्ट करण्यास सक्षम असतील.

थ्रेड्समध्ये यूजरला फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

यूजर्स थ्रेड्स अॅपवर 5 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ पोस्ट करू शकतील.

तुम्ही Instagram यूजर असल्यास, तुम्हाला थ्रेडसाठी वेगळे अकाऊंट तयार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त थ्रेड अॅप डाउनलोड करायचे आहे. यानंतर अॅप आपोआप लॉगिन होईल. यासाठी पासवर्डची गरज नाही.

अधिक बातम्यांसाठी