Toothache Remedy : 'या' 4 स्वस्त गोष्टींनी काही मिनिटांत दूर करा दातदुखी!

जेव्हा आपल्याला  सौम्य दातदुखी होत असते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हळूहळू ही दातदुखी पुढे वाढत जाते. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. या उपायांच्या मदतीने दातांच्या वेदना आणि सूज यापासून आराम मिळू शकतो. 

चला जाणून घेऊया दातदुखीच्या समस्येपासून कशी सुटका मिळेल?

सैंधव मीठ

सैंधव मिठाचा वापर केल्याने दातांच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. यासाठी १ ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात चिमूटभर सैंधव मीठ मिसळा आणि गार्गल करा. यामुळे दातांमध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे दातदुखी कमी होते. यासाठी 1 चमचा कांद्याचा रस घेऊन दातांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा. यामुळे वेदनांपासून आराम मिळू शकतो.

लवंग तेल

दातदुखी कमी करण्यासाठी लवंग तेलाचा वापर करा. लवंग तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना कमी होऊ शकतात. तसेच, हिरड्यांमधील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

हिंग आणि लिंबू

हिंग आणि लिंबाचा रस वापरणे प्रभावी ठरू शकते. याच्या मदतीने वेदना बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात. यासाठी दोन चिमूटभर हिंग घ्या त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि कापसाच्या मदतीने दातांवर लावा. काही काळ राहू द्या. यामुळे दातदुखी बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आहे, हे कसं ओळखाल? ‘हे’ खावंस वाटलं की समजून जा!