अस्थमा कंट्रोल करण्यासाठी 'रामबाण' घरगुती उपाय, एकदा करून पाहा!

दमा ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये व्यक्तीला श्वास घेण्यास खूप त्रास होतो. वाढत्या प्रदूषणामुळे याचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसत आहे. 

आता लहान मुलेही या आजाराला बळी पडत आहेत.  कधीकधी दमा हा प्राणघातक देखील ठरू शकतो . 

ही समस्या टाळण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य राखणे गरजेचे आहे. मात्र, जर कोणाला ही समस्या जन्मापासूनच असेल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय करू शकता. 

चक्रफूल

चक्रफूल दम्याच्या समस्येचा सामना करण्यास मदत करू शकते. मधासोबत घेतल्यास ते दम्याशी संबंधित ब्रोन्कियल खोकल्याचा सामना करण्यास देखील मदत करू शकते. 

ओव्याची पानं

ओव्याची पाने दम्याच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात. ही पाने पाण्यात उकळून त्याची वाफ घेतल्याने दम्याच्या त्रासापासून अराम मिळतो . यामुळे छातीत जडपणा जाणवत नाही  

लवंग

भारतीय स्वयंपाकघरात लवंगाचा वापर सर्रास केला जातो. हे दम्याला देखील मदत करू शकते.  यासाठी लवंग पावडर, तुळशीची काही पाने आणि काळी मिरी घेऊन थोड्या पाण्यात उकळा आणि  ते प्या.

ज्येष्ठमध

आयुर्वेदिक डॉक्टर ज्येष्ठमधपासून बनवलेला चहा पिण्याचा सल्ला देतात, चहा बनवण्यासाठी, त्याची मुळे घ्या आणि पाण्यात उकळा. हा चहा पिणे दम्यामध्ये फायदेशीर ठरू शकते.

दुधासोबत चुकूनही घेऊ नका ‘ही’ औषधे, जीवावर बेतेल!!