चांगल्या झोपेसाठी 'या' 6 गोष्टी करून पाहा, उठल्यावर एकदम फ्रेश दिसाल!

पुरेशी झोप तुमच्या मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रात्री चांगली झोप न मिळाल्याने तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. अशा स्थितीत तुम्ही चांगल्या झोपेबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.

मेलाटोनिन नावाचा संप्रेरक चांगल्या झोपेसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार असतो. मेंदूमध्ये तयार होणारा हा हार्मोन तुमच्या जागृततेच्या चक्राला चांगल्या झोपेसह नियंत्रित करतो. मेलाटोनिन तुम्हाला लवकर आणि गाढ झोपायला मदत करते. हा हार्मोन तुमचा तणाव कमी करतो आणि तुम्हाला आराम देतो.

मॅग्नेशियम-समृद्ध पदार्थांच्या मदतीने तुम्ही मेलाटोनिनची पातळी वाढवू शकता. यासाठी झोपण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आहारात पुढील काही पदार्थांचा समावेश करा जेणेकरून तुमची झोप आणि आरोग्य दोन्ही चांगले राहील.

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील हा महत्त्वाचा मसाला आहे. वेलची तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करू शकते. याने तुमची पचनक्रियाही मजबूत होते. झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधात एक किंवा दोन वेलची मिसळून पिऊ शकता किंवा तुम्ही ती  थेट चावून खाऊ शकता.

जायफळातील काही संयुगे मेंदूला शांत करण्यास आणि झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करतात. यामध्ये असलेले मायरीस्टिसिन्स झोपेची गुणवत्ता वाढवतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.

आयुर्वेदात अश्वगंधा ही अत्यंत महत्त्वाची वनौषधी मानली जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की अश्वगंधा झोपेची गुणवत्ता सुधारते. यामुळे निद्रानाशाची समस्याही दूर होते. अश्वगंधा शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करते, ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही आराम करते. हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास देखील मदत करते, जे झोपेसाठी आवश्यक आहे.

धणे तुमच्या मज्जासंस्थेला आराम देतात, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. यासाठी तुम्ही  दोन कप पाण्यात एक चमचा धणे घाला. पाणी निम्मे होईपर्यंत उकळवा आणि नंतर गाळून हे पाणी सेवन करा.

कॅमोमाइल चहा प्यायल्याने गाढ झोपायला मदत होते. या चहामुळे शरीरातील मेलाटोनिनची पातळी वाढते. यात एपिजेनिन नावाचा घटक असतो जो मेंदूला आराम देतो, ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.

चेरी आणि किवी दोन्ही खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप लागते. चेरीमध्ये मेलाटोनिन भरपूर प्रमाणात असते. रात्री चेरी खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने झोप चांगली लागते. किवी मेलाटोनिनची पातळी देखील वाढवते. याचे सेवन केल्याने निद्रानाशाची समस्या दूर होते.

तंदुरुस्त राहण्यासाठी ‘या’ आयुर्वेदिक सवयी लावा, काही दिवसात फरक दिसेल!