अस्थमाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात लसणाच्या साली, जाणून घ्या त्याचे फायदे
आयुर्वेदामध्ये लसणाचे वर्णन काही आरोग्याच्या समस्यांपासून संरक्षण करणारे औषध म्हणून केले गेले आहे, तर लसणाचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो.
स्वयंपाकघरात लसूण भरपूर प्रमाणात वापरतात. पण त्याची साले काढून फेकून देतात. लसणाच्या पाकळ्यांप्रमाणेच लसणाची सालेही खूप उपयुक्त आहेत.
लसणाची साल तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. चला तर जाणून घेऊया लसणाच्या सालीचे आरोग्य फायदे
ज्यांना खाज आणि एक्जिमा सारख्या त्वचेच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी लसणाची साल खूप उपयुक्त आहे. लसणाची साले थोड्या पाण्यात भिजवा आणि काही तासांनी हे पाणी प्रभावित भागावर लावा. यामुळे खाज आणि चिडचिड या समस्येपासून आराम मिळेल.
लसणाची साले बारीक करून केसांना लावा. डोक्यात उवा असल्यास त्या नष्ट होतात. यामुळे डोक्यातील कोंडा आणि खाज येण्याची समस्या कमी होते.
लसणाची साले पाण्यात भिजवून मग त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये मध घाला. हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोनदा खाऊ शकता. यामुळे दम्यापासून आराम मिळतो.
कोमट पाण्यात लसणाची साले टाका आणि या पाण्यात पाय काही वेळ भिजवा. पायांची सूज आणि वेदना हळूहळू कमी होईल.
चेहऱ्यावर चुकूनही लावू नका स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तू चेहरा होईल खराब