उन्हाळ्यात रोज जेवणासोबत कांदा खाण्याचे फायदे, जाणून घ्या!

अनेकदा कच्चा कांदा  सॅलडसारखा खाल्ला जातो. भारतीय स्वयंपाकघरात कांद्याशिवाय भाज्या अपूर्ण राहतात. शिजवलेला कांदा चवीला चांगला असतोच पण  कच्चा कांदासुद्धा चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो. 

विशेषतः उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे चांगले. त्यात क्वेरसेटिन आढळते, जे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे. याच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

Off-white Banner

चला जाणून घेऊया उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे.

उन्हाळ्यात उष्माघातामुळे लोक आजारी पडतात. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने  उष्माघात सारख्या समस्या टाळता येतात.

कांद्याचे पोषक घटक केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत नाहीत तर शरीराला आतून थंड ठेवण्यासही मदत करतात.

उन्हाळ्याच्या हंगामात, लोक अनेकदा पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या पाचन समस्यांची तक्रार करतात. कच्चा कांदा या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कच्चा कांदा लिंबाच्या रसात खावा.

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने  शरीर आतून थंड होते, त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.

कांद्याचे सेवन केल्याने हाडांनाही फायदा होतो. हाडांची घनता वाढवण्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. 

चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत ‘हे’ 6 पदार्थ, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक!