बांगडा खा आणि सांधेदुखीपासून आराम  मिळवा, वाचा बांगडा खाण्याचे फायदे

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी काही लोक फळे आणि हिरव्या भाज्यांना त्यांच्या आहाराचा भाग बनवतात. त्याचबरोबर काही लोक मांसाहार करतात. 

मांसाहारी पदार्थांमध्ये मासे हा बहुतांश लोकांचा आवडता पदार्थ आहे. अप्रतिम चवीशिवाय, मासे खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. 

बांगडा खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे :

एका संशोधनात असे दिसून आले आहे की बांगडा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे. या कारणास्तव, त्याचे सेवन हृदय निरोगी ठेवण्यास तसेच स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. 

ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी बांगडा खाणे उपयुक्त ठरते. ओमेगा ३ फॅटी ॲसिड बांगड्यामध्ये मुबलक प्रमाणात असते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड वाढत्या रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यास प्रभावी ठरू शकते. 

एका संशोधनानुसार काही पुरुषांना बांगडा नियमितपणे खाण्यास सांगितले गेले. संशोधनात असे समोर आले आहे की बांगडा खाल्ल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. 

बांगड्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते जी  शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरूशकते. 

बांगड्यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् शरीरातील एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. 

एका संशोधनात स्पष्टपणे नमूद केले आहे की बांगड्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आढळते, जे वजन कमी करण्यास मदत करते. वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणारे लोक बांगडा तळून ते त्यांच्या आहाराचा भाग बनवू शकतात.

बांगड्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी प्रभाव असतो, ज्यामुळे संधिवाताच्या समस्येत आराम मिळतो. त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांना बांगडा खाण्याचा सल्ला दिला जातो.

उन्हाळ्यात कस तरी होतंय? आहारात करा कोकमचा समावेश, वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे