उन्हाळ्यात कस तरी होतंय? आहारात करा कोकमचा समावेश, वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे
कोकम हे औषधी फळ मानले जाते. याचे शास्त्रीय नाव गार्सिनिया इंडिका आहे. कोकण ,गोवा आणि गुजरातमध्ये आढळणारे हे अत्यंत फायदेशीर फळ आहे. ज्याचा उपयोग अनेक प्रकारे केला जातो, जसे की स्वयंपाकात, मसाला, औषध म्हणून आणि तेलाच्या स्वरूपातही.
कोकम खाण्याचे काय फायदे आहेत?
कोकम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यामुळे तुमच्या आहारात कोकमचा समावेश करा. कोकममध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे तुम्हाला आजारांपासून सुरक्षित ठेवते.
जुलाबाची समस्या असली तरी कोकम खाणे खूप फायदेशीर आहे. कोकममध्ये अतिसार विरोधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे ते अतिसारावर प्रभावी उपचार आहे. अतिसार झालेल्या रुग्णाला कोकम फळाचा रस द्या.
कोकम खाल्ल्याने मेटाबॉलिज्म वाढते. कोकममध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप कमी असते. त्यामुळे ते खाल्ल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते.
रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी कोकमचा रस पिणे फायदेशीर ठरते.
कोकम खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होतो. वास्तविक, कोकममध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मँगनीज आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात. हे सर्व घटक हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराची शक्यताही कमी होते.
मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होतात का? या गोष्टी खाणे सुरू करा, आराम मिळेल