तुम्हाला तुमची किडनी शाबूत ठेवायची असेल तर हि ५ फळे नक्की खा

किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनीमध्ये थोडासा अडथळा देखील संपूर्ण शरीराच्या अंतर्गत प्रणालीला हादरवून टाकतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के युक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. 

किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात या 5 फळांचा समावेश करा-

डाळिंबात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने किडनी निरोगी राहण्यास मदत होते. डाळिंबातील पोषक घटक शरीरातील जळजळ कमी करतात. डाळिंबात अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: प्युनिकलॅजिन्स आणि अँथोसायनिन्स मुबलक प्रमाणात असतात, जे किडनीला आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

सफरचंद किडनीच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. सफरचंदांमध्ये पेक्टिन नावाचे संयुग असते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ज्याच्या मदतीने किडनी निरोगी ठेवण्यास मदत होते. 

संत्री, लिंबू आणि द्राक्षे यांसारखी लिंबूवर्गीय फळे देखील किडनीच्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, जे मूत्रातील कॅल्शियमसह एकत्रित होऊन किडनी स्टोन टाळण्यास मदत करते.

पपई किडनी आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. फायबर मल मऊ करून आतड्याची हालचाल सुलभ करण्याचे काम करते. पचनक्रिया सुरळीत राहिल्यास त्याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावरही दिसून येतो.

किडनीच्या आरोग्यासाठीही कलिंगड खूप फायदेशीर आहे. कलिंगड हे हायड्रेटिंग फळ आहे. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते किडनी निरोगी ठेवण्यास मदत करते. कलिंगडमध्ये लाइकोपीन देखील असते, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट जो किडनीचे आरोग्य सुधारतो.

Health : ‘या’ 5 लोकांनी चुकूनही उसाचा रस पिऊ नये, तब्येत बिघडू शकते!