महिंद्र थारने आपल्या स्टाइलिंग आणि ऑफरोडिंगने सर्वांची मने जिंकली आहेत.
नुकतीच लाँच झालेली मारुती सुझुकी जिम्नी आता थारला टक्कर देत आहे.
पण आता थार आणि जिम्नीसोबत फोर्सची गुरखा ही एक गाडी आहे जी सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
ही गाडी 2.6 लीटर डिझेल इंजिनसह येते, जे 90 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते.
या गाडीला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो सर्व चाकांना पॉवर पुरवतो.
फोर्सने नवीन गुरखामध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येते.
फोर्सने नवीन गुरखामध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येते.
यात मॅन्युअल एसी, 4-स्पीकर साउंड सिस्टीम आणि फ्रंट पॉवर विंडो सारखी वैशिष्ट्ये आहेत.
गुरखामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
अधिक बातम्यांसाठी
क्लिक करा!