चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत 'हे' 6 पदार्थ, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक!

भारतीय घरांमध्ये फ्रिज हा अन्नाचा रक्षक मानला जातो. फ्रिजचा वापर अन्नपदार्थ जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा खराब होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. 

कच्च्या भाज्या किंवा शिजवलेले अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवले जाते, पण काही घरातील फ्रीजमध्ये संपूर्ण मसाल्यापासून ते ड्रायफ्रुट्स, बियाणे, फळे आणि नको नको ते ठेवले जाते. 

पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवता खराब होऊ शकतात. बहुतेक लोकांना याची माहिती नसते. 

1. बटाटा

भारतीय स्वयंपाकघरात बटाट्यांचा वापर नेहमीच मुबलक प्रमाणात केला जातो. ते खराब होऊ नये म्हणून काही लोक ते फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे करणे चुकीचे आहे. फ्रीजमध्ये बटाटे ठेवल्यास बटाट्याच्या स्टार्चचे साखरेत रूपांतर होते जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे बटाटे नेहमी घरात थंड, गडद ठिकाणी ठेवा.

2. लसूण

लसूण फ्रीजमध्ये ठेवल्याने  त्याची चव बदलते. लसूण सोलून फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याचे औषधी गुणधर्म नष्ट होतात. म्हणून, लसूण नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवा. प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यामध्ये ठेवा.

3. मसाले

मसाले देखील फ्रीजपासून दूर ठेवावेत. कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव, वास आणि गुणांवर परिणाम होतो. वास्तविक मसाले फ्रीजमधून ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे त्यांची नैसर्गिक चव खराब होते.

4. ड्रायफ्रुट्स

काजू, बेदाणे, बदाम, अक्रोड इत्यादी सुका मेवा आणि बिया बहुतेक घरांमध्ये फ्रीजमध्ये ठेवतात. असे मानले जाते की यामुळे त्यांचे आयुष्य वाढते. पण फ्रीजच्या थंड तापमानाचा त्यांच्या नैसर्गिक साखरेवर आणि चवीवर परिणाम होतो. फ्रीजमध्ये ड्रायफ्रुट्स ओलसर होतात, ज्यामुळे बुरशीची वाढ होते. त्यांच्या कुरकुरीतपणावरही परिणाम होतो. एवढेच नाही तर त्यांचे नैसर्गिक तेलही कमी होते.

5. केशर

फ्रीजमध्ये उच्च आर्द्रता असते, ज्यामुळे केशरचे धागे मऊ आणि चिकट होऊ शकतात. कधी कधी यामुळे केशर कोरडेही होते. या दोन्ही परिस्थितीत केशराची नैसर्गिक चव आणि सुगंध कमी होतो. एवढेच नाही तर रेफ्रिजरेटरच्या प्रकाशामुळे केशराचा रंगही फिका पडतो.

6. केळी

केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होतात . केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची त्वचा काळी पडू शकते. 

तुम्हाला ही 5 लक्षणं जाणवतात? आता ‘बॉडी डिटॉक्स’ करण्याची गरज आहे! जाणून घ्या…