शरीरात व्हिटॅमिनची कमतरता आहे, हे कसं ओळखाल? 'हे' खावंस वाटलं की समजून जा!

जर तुम्हाला फ्रेंच फ्राईज किंवा खारट चिप्स खावेसे वाटत असतील तर तुमच्यात इलेक्ट्रोलाइट्स किंवा ओमेगा -3 ची कमतरता असू शकते. ओमेगा-३ च्या कमतरतेवर मात करण्यासाठी एवोकॅडो आणि अक्रोड खा.

जर तुम्हाला कोल्ड ड्रिंक प्यायची इच्छा झाली असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता आहे. कोल्ड्रिंक्सऐवजी आइस्ड हर्बल टीचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

चॉकलेट खाण्याची जास्त इच्छा होत असेल  तर तुमच्या शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेचे कारण असू शकते. चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम सर्वाधिक आढळते. मात्र, चॉकलेट खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याऐवजी तुम्ही पीनट बटर खाऊन मॅग्नेशियमच्या कमतरतेवर मात करू शकता.

 जर तुम्हाला बर्फ खावासा वाटत असेल तर ते तुमच्या शरीरात लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरातील या पोषक तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा खाऊ शकता.

अनेकांना मांसाहाराची आवड असते. जर तुम्हाला मांस खाण्याची तीव्र इच्छा असेल तर तुमच्या शरीरात झिंक आणि लोहाची कमतरता असू शकते. याशिवाय व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळेही मांसाहाराची इच्छा निर्माण होते.

अनेकांना ब्रेड खाण्याचीही इच्छा होत असते. हे शरीरात नायट्रोजनची कमतरता दर्शवू शकते. ज्या लोकांना पिझ्झा, पास्ता खाण्याची इच्छा होत असते त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. चीजमध्ये कॅल्शियमसह भरपूर संतृप्त चरबी आणि सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल वाढते.त्याऐवजी तुम्ही पनीर खाऊ शकता.

यूरिक ऍसिडचा त्रास असलेल्या रूग्णांसाठी 5 भाज्या, सांधेदुखीपासूनही मिळेल आराम!