नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सर्वोत्तम जागा, कमी खर्चात फुल धमाल!

काही दिवसात लोक 2023 ला निरोप देतील आणि 2024 या वर्षाचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतील. भारतात विविध ठिकाणी नवीन वर्ष उत्साहात साजरे केले जाते. लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकदा लोक नवीन वर्षात प्रवास करण्याचे बेत आखतात.

जर तुम्हीही एखाद्या ठिकाणी जाऊन नवीन वर्ष साजरे करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही या ठिकाणी कमी खर्चात फुल धमाल करू शकता.

मनाली

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही मनालीला जाऊ शकता. येथे ठिकठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या जातात. आपण मित्रांसह येथे सहलीची योजना करू शकता.

ऋषिकेश

मित्रांसोबत फिरण्यासाठी ऋषिकेश हे उत्तम ठिकाण आहे. नवीन वर्ष शांततेने साजरे करण्यासाठी ऋषिकेश हे एक चांगले ठिकाण आहे, जिथे तुम्ही योग आणि ध्यानाचा सराव देखील करू शकता.

माउंट अबू

माउंट अबू हे राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन आहे. जर तुम्हाला एखाद्या खास ठिकाणी नवीन वर्ष साजरे करायचे असेल तर तुम्ही माउंट अबूला जाऊ शकता. तुम्ही कुटुंबीयांसह येथेही जाऊ शकता.

जैसलमेर

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तुम्ही जैसलमेरलाही जाऊ शकता. राजेशाही जीवनाचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. 

डेहराडून

डेहराडूनला तुम्ही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी जाऊ शकता. येथे अनेक क्लब आहेत जिथे नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते.

ब्लड प्रेशर लगेच कंट्रोल करणारे 5 ड्रिंक्स! वाचा फायद्याची माहिती