तंदुरुस्त राहण्यासाठी 'या' आयुर्वेदिक सवयी लावा, काही दिवसात फरक दिसेल!
तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारणे महत्त्वाचे आहे. आजकाल लोक आपले आरोग्य राखण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करत आहेत. आयुर्वेदानुसार जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहू शकता.
1) जेवण करण्यापूर्वी आणि नंतर योग्य वेळी पाणी प्या.
२) तुमच्या कडधान्यांमध्ये हिंग घालायला कधीही विसरू नका, विशेषत: ज्यात प्रथिने भरपूर असतात.
३) नाकात दोन थेंब तिळाचे तेल, मोहरीचे तेल किंवा तूप टाका. यामुळे अकाली केस पांढरे होत नाहीत आणि टक्कल पडत नाही. असे केल्याने चांगली झोप येण्यासही मदत होते.
४) कच्च्या भाज्या शिजवलेल्या अन्नासोबत खाऊ नका. कारण शिजवलेले अन्न सहज पचते. तर कच्च्या भाज्या पचवताना वात उत्तेजित होतो, ज्यामुळे पचनक्रिया विस्कळीत होते.
५) जिरे, धणे, आले आणि हळद रोज खा. हे मसाले पचनास मदत करतात, हृदय निरोगी ठेवतात आणि जळजळांशी लढतात.
बांगडा खा आणि सांधेदुखीपासून आराम मिळवा, वाचा बांगडा खाण्याचे फायदे