Rashmika Mandanna Net worth : 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाची संपत्ती किती? वाचा!

रश्मिका तिच्या लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखली जाते. एका आकडेवारीनुसार, 2023 पर्यंत तिची एकूण संपत्ती सुमारे 65 कोटी रुपये आहे. 

रश्मिकाने साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावलं. तिच्या दमदार अभिनयामुळे आणि ग्लॅमरस चेहऱ्यामुळे रश्मिका आज दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

रश्मिका केवळ चित्रपटांतूनच कमावत नाही, तर जाहिरात आणि मॉडेलिंगमधूनही लाखो रुपये कमावते. 

कमाईसोबतच मंदाना धर्मादाय आणि सामाजिक कार्यातही व्यस्त आहे. सामाजिक कार्याशी निगडीत अनेक संस्थांसोबत ती जवळून काम करत आहे.

चित्रपट आणि स्टेज शो व्यतिरिक्त मंदाना जाहिरातींमधून करोडोंची कमाई करते. नुकत्याच सुरू झालेल्या आयपीएल 2023 च्या ओपनिंग सेरेमनीत रश्मिकाला परफॉर्मन्ससाठी बोलावण्यात आले होते.

रश्मिकाने कमाईसोबतच भरपूर प्रॉपर्टीही बनवली आहे. त्यांनी केवळ दक्षिण आणि मुंबईतच नव्हे तर देशभरातील अनेक शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. 

रश्मिकाची बंगळुरूमध्ये 8 कोटी रुपयांची आलिशान हवेली असून तिने मुंबईत एक आलिशान अपार्टमेंटही खरेदी केले आहे.

रश्मिकाला लक्झरी आणि ब्रँडेड उत्पादने वापरायला आवडतात. तिच्या कलेक्शनमध्ये अनेक डिझायनर हँडबॅग, आउटफिट, शूज आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. या सर्वांची किंमत तीन ते पाच लाखांच्या दरम्यान आहे. 

तेलुगू चित्रपटांतून आपल्या करिअरची सुरुवात करून बॉलिवूडमध्ये पोहोचलेल्या रश्मिकाने आपल्या मेहनतीने सर्व काही कमावले आहे.

मराठीतील 'भारी' बातम्यांसाठी