हे प्रभु…! झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या

WhatsApp Group

Zimbabwe Highest T20is Total Record : झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठोकली आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील संघाने नैरोबी येथे खेळल्या जात असलेल्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता गट बी 2024 सामन्यात गांबियाविरुद्ध हा विश्वविक्रम केला आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने 20 षटकांत 344 धावा केल्या. या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या 43 चेंडूत सात चौकार आणि 15 षटकारांच्या मदतीने नाबाद 133 धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यात सर्व फलंदाजांनी मिळून एकूण 27 षटकार ठोकले.

सिकंदर रझाचे शतक हे पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये झिम्बाब्वेच्या खेळाडूने केलेले पहिले शतक आहे. डिओन मायर्सने एका दिवसापूर्वी रवांडाविरुद्ध 96 धावा केल्या होत्या, जी संघाच्या कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती. सिकंदर रझाने एक दिवस अगोदर रवांडाविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या, बुधवारी त्याने फलंदाजीत आपले कौशल्य दाखवले.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द, वडिलांवर ‘मोठा’ आरोप! जाणून घ्या प्रकरण

त्यांच्याशिवाय ब्रायन बेनेटने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या तर यष्टीरक्षक टी मारुमणीने केवळ 19 चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. त्याच्याशिवाय क्लाइव्ह मदनेने 17 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 53 धावांची खेळी केली.

या महिन्याच्या सुरुवातीला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताने बांगलादेशविरुद्ध 297 धावा केल्या होत्या. पूर्ण सदस्य राष्ट्रासाठी ही सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु झिम्बाब्वेने हा विक्रम अवघ्या 11 दिवसांत मोडला आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment