झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटरचे निधन, पत्नीची इमोशनल पोस्ट

WhatsApp Group

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक याचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. तो 49 वर्षांचा होता आणि कर्करोगाशी झुंज देत होता. याआधीही स्ट्रीकच्या निधनाची बातमी आली होती पण ती अफवा ठरली होती. स्ट्रीकने स्वतः एक निवेदन जारी करून हे वृत्त फेटाळले होते. मात्र, यावेळी पत्नी आणि वडिलांनी हीथच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

हीथ स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 1990 आणि 3 हजार धावा केल्या. पण त्याला त्याच्या गोलंदाजीची ओळख मिळाली. त्याने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आणि तरीही तो झिम्बाब्वेसाठी दोन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.

हेही वाचा – Blood Pressure : उच्च रक्तदाब कमी करणाऱ्या 5 औषधी वनस्पती!

यापूर्वी हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी 23 ऑगस्टला आली. त्याचा सहकारी क्रिकेटर हेन्री ओलांगाने एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून याची पुष्टी केली होती. मात्र, काही वेळाने ओलांगाने व्हॉट्सअॅपचा स्क्रीन शॉट शेअर केला आणि स्ट्रीकच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे म्हटले.

स्ट्रीकने 2000 ते 2004 दरम्यान संघाचे नेतृत्व केले होते. आपल्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकट्याने झिम्बाब्वेला अनेक प्रसंगी विजय मिळवून दिला. 100 कसोटी बळी घेणारा तो एकमेव झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment