सकाळी 6 वाजता मृत आणि 4 तासांनी जिवंत! दिग्गज क्रिकेटरच्या निधनाचा गोंधळ

WhatsApp Group

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी पसरली आणि क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडाली. स्ट्रीक काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होता. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. 2005 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हीथ स्ट्रीकवर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू होते. दीर्घकाळ खेळणारा वेगवान गोलंदाज हेन्री ओलांगा, सध्याचा संघाचा कर्णधार शॉन विल्यम्स, भारतीय क्रिकेटपटू आर अश्विनसह अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर स्ट्रीकच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. मात्र स्ट्रीकच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे.

कारकीर्द

हिथ स्ट्रीकने झिम्बाब्वेसाठी 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले. अष्टपैलू म्हणून त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. या वेगवान गोलंदाजाने कसोटीत 216 विकेट घेतल्या. 73 धावांत 6 बळी ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 7 वेळा 5 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने एक शतक आणि 11 अर्धशतकांसह 1990 धावा केल्या. नाबाद 127 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. एकदिवसीय रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर स्ट्रीकने 239 विकेट घेतल्या. 32 धावांत 5 बळी ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. तसेच 13 अर्धशतकांच्या जोरावर 2943 धावा केल्या.

हेही वाचा – भारतीय डाक विभागात नोकरी..! लोकेशन नवी मुंबई, ‘या’ लिंकवर भरा अर्ज!

हीथ स्ट्रीक हा कसोटी क्रिकेटमध्ये 1000 हजाराहून अधिक धावा आणि 100 हून अधिक बळी घेणारा एकमेव क्रिकेटर आहे. 2021 मध्ये ICC ने त्याच्यावर भ्रष्टाचारामुळे 8 वर्षांची बंदी घातली होती. तो झिम्बाब्वेचा सर्वात यशस्वी एकदिवसीय कर्णधार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment