

Shikhar Dhawan Jersey : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतही भारतीय संघानं (ZIM vs IND) नाणेफेक जिंकली, मात्र यावेळी त्यांनी गोलंदाजीऐवजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात शिखर धवन फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याची जर्सी बदललेली दिसली. धवनच्या शर्टच्या मागील बाजूस, जिथं खेळाडूचं नाव लिहिलेले असतं, ते एका सपोर्ट स्टाफ सदस्यानं टेपच्या साहाय्यानं झाकलं होतं. खरं तर धवननं शार्दुल ठाकूरची जर्सी घातली होती.
शिखर धवननं शार्दुलची जर्सी का घातली, याबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. पण सामन्यादरम्यान झिम्बाब्वेच्या एका चाहत्यानं धवनची जर्सी घेण्यासाठी एक फलक आणला होता, ज्यावर त्यानं धवनला जर्सी देण्याबाबत लिहिलं होतं. ही घटना भारतीय डावाच्या २७व्या षटकात घडली, जेव्हा धवन डगआउटमध्ये बसला होता. त्याच्यासोबत कर्णधार केएल राहुल, ऋतुराज गायकवाड आणि आवेश खान देखील उपस्थित होते. त्या चाहत्यानं फलकावर लिहिलं होतं, “शिखर, मी तुझा शर्ट घेऊ शकतो का?”
हेही वाचा – विराट कोहलीच्या भविष्याचं काय? शाहिद आफ्रिदीनं ५ शब्दात दिलं उत्तर!
📹 | 𝙔𝙚 𝙨𝙝𝙞𝙧𝙩 𝙝𝙪𝙢𝙠𝙤 𝙙𝙚𝙙𝙚 𝙂𝙖𝙗𝙗𝙖𝙧𝙧𝙧𝙧 🤭🔫
P.S: Watch till the end for @SDhawan25's hilarious reaction 👻#ShikharDhawan #ZIMvIND #TeamIndia #SirfSonyPeDikhega pic.twitter.com/1Oz4MUAfxY
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 22, 2022
चाहत्याच्या मागणीला धवनचं उत्तर!
सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं या चाहत्याचं लक्ष वेधलं आणि धवननं हा फलक पाहिल्यावर तिथंच बसून जर्सी काढण्याचा प्रयत्न केला. हे पाहून उपस्थित सर्व खेळाडू हशा पिकला. मागील सामन्यात ३३ धावा करणाऱ्या शिखर धवननं तिसऱ्या सामन्यात ४० धावा केल्या. त्याला ब्रॅड इव्हान्सने झेलबाद केलं. ६८ चेंडूत ५ चौकार मारून धवन चांगल्या लयीत दिसला. त्यानं कर्णधार केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारीही केली. राहुल ३० धावा करून बाद झाला.
हेही वाचा – वर्ल्ड चॅम्पियनला ६ महिन्यात तीनदा चारली धूळ..! भारताच्या १७ वर्षीय प्रज्ञानंदचा पराक्रम
भारताचं निर्भेळ यश
भारतीय संघानं सोमवारी मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या वनडेत झिम्बाब्वेवर १३ धावांनी विजय मिळवला. अशाप्रकारे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतानं एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा ३-० असा पराभव केला. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ गडी गमावत २८९ धावा केल्या. यानंतर सिकंदर रझा (११५) च्या शतकानंतरही झिम्बाब्वे संघ ४९.३ षटकांत २७६ धावांत ऑलआऊट झाला.
सिकंदर रझाने झिम्बाब्वेसाठी खूप प्रयत्न केले पण त्याला विजय मिळवण्यात यश आलं नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रझाने ९५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकार मारले. सिकंदरने भारताविरुद्ध प्रथमच वनडेत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील एकूण सहावं शतक ठरलं. तत्पूर्वी शुबमन गिलनं कारकिर्दीतील पहिलं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं. त्यानं ९७ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं १३० धावा केल्या.