6,6,6,4….युसुफ पठाणचं झिम्बाब्वेमध्ये तांडव, मोहम्मद आमिरला धू-धू-धुतलं!

WhatsApp Group

Zim Afro T10 2023 : युसूफ पठाण आणि रॉबिन उथप्पा हे दोन्ही दिग्गज भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, पण दोघांची बॅट अजूनही जोरदार बोलते आहे. पठाण आणि उथप्पा हे सध्या झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणाऱ्या T10 लीगमध्ये दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या संघासाठी अर्धशतके झळकावली आणि संघाला विजयही मिळवून दिला. पठाण आणि उथप्पाने मिळून 15 षटकार ठोकले. पठाणने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर जोरदार प्रहार केला. त्याने आमिरच्या एका षटकात 3 षटकार आणि एक चौकार मारून 25 धावा केल्या.

युसूफ पठाणच्या टीम जोहान्सबर्ग बफेलोजसमोर डरबन कलंदर्सने 141 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. डर्बनकडून आंद्रे फ्लेचरने 14 चेंडूत 39 आणि असील अलीने 12 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. डर्बनने निर्धारित 10 षटकांत 4 गडी गमावून 140 धावा केल्या. नूर अहमदने 2 षटकांत 9 धावा देत 2 बळी घेतले. प्रत्युत्तरात जोहान्सबर्गने 57 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या.

हेही वाचा – फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, बाजुचे हॉटेलही कोसळले!

युसूफ पठाणने मुशफिकुर रहीमसह जोहान्सबर्ग बफेलोजला रोमांचक विजय मिळवून दिला. 7 षटकांनंतर संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा होती. आता संघाला 18 चेंडूत 64 धावा करायच्या होत्या. मोहम्मद आमिरने 8 वे षटक टाकले. पठाणने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर एकही रन आला नाही. पठाणने चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला. पुढचा चेंडू वाईड होता. शेवटच्या चेंडूवर चौकार मारताना 5व्या चेंडूवर 2 धावा काढल्या. अशा प्रकारे 8व्या षटकात 25 धावा झाल्या.

शेवटच्या षटकात 20 धावा

ब्रॅड इव्हान्सने 9वे षटक टाकले. या षटकातही पठाणने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला. अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी 20 धावा करायच्या होत्या. रहिमने पहिल्याच चेंडूवर एकेरी घेतली. वेगवान गोलंदाज तेंडाई चताराच्या पुढील 4 चेंडूंवर युसूफ पठाणने 6, 4, 6, 4 धावा करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पठाणने 26 चेंडूत 80 धावा केल्यानंतर नाबाद राहिला, स्ट्राइक रेट 308 होता. त्याने 4 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याचवेळी, रहीमने 10 चेंडूत 14 धावावंर नाबाद राहिला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment