FIFA WC 2022 : भारतातून ‘फरार’ झाकीर नाईकचं कतारमध्ये स्वागत..! करणार इस्लामचा प्रचार

WhatsApp Group

Zakir Naik In FIFA WC 2022 : कतारने फिफा विश्वचषक २०२२ मध्ये प्रवचन देण्यासाठी भारतात बंदी असलेला वादग्रस्त भारतीय इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईकला आमंत्रित केले आहे. भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप असलेला नाईक २०१७ पासून मलेशियामध्ये निर्वासित जीवन जगत आहे. भारताने त्याला फरारी घोषित केले आहे. कतारच्या सरकारी स्पोर्ट्स चॅनल अलकासचे प्रेझेंटर फैसल अलहजरी यांनी ट्वीट केले की, “विश्वचषक स्पर्धेदरम्यान धर्मोपदेशक शेख झाकीर नाईक कतारमध्ये आहे आणि तो संपूर्ण स्पर्धेत अनेक धार्मिक व्याख्याने देणार आहेत.”

भारताने २०१६च्या उत्तरार्धात झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) वर त्याच्या अनुयायांकडून विविध धार्मिक समुदाय आणि गटांमधील शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना या भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बंदी घातली आणि मदत पुरवल्याच्या आरोपावरून बेकायदेशीर घोषित करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये, गृह मंत्रालयाने (MHA) IRF ला बेकायदेशीर संघटना घोषित केले आणि त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली.

हेही वाचा – NZ Vs IND 3rd T20 : न्यूझीलंडला ४४० वोल्टचा धक्का.! तिसऱ्या मॅचपूर्वी मिळाली ‘बॅड’ न्यूज

काही दिवसांपूर्वी कतार सरकारने ५५८ फुटबॉल चाहत्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचा प्रचार केला होता. जुलै २०१६ मध्ये बांगलादेशची राजधानी ढाका येथे ५ दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यात २९ लोक मारले गेले होते. या घटनेच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने सांगितले की, झाकीर नाईकच्या भाषणाचा त्याच्यावर प्रभाव होता. यानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने या प्रकरणाचा तपास केला. प्राथमिक तपासानंतर झाकीर नाईकच्या एनजीओवर यूएपीए अंतर्गत बंदी घालण्यात आली. झाकीर नाईक २०१६ मध्येच भारत सोडून मलेशियाला पळून गेला होता. आयआरएफवर बंदी घालण्याबाबत केंद्र सरकारने सांगितले की, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन अशा कारवायांमध्ये सामील आहे, जे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. यामुळे देशातील शांतता, जातीय सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे.

Leave a comment