OMG..! चहल आणि धनश्री वेगळे होतायत? दोघांनी केलंय ‘असं’ काही की चर्चाच रंगतेय!

WhatsApp Group

Yuzvendra Chahal Dhanashree Verma : टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल त्याच्या जादुई गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मा हिला देखील सोशल मीडिया क्वीन मानलं जातं. या दोघांची जोडी सर्वात सुपरहिट जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण दोन दिवस ही जोडी वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आहे. आता या जोडीमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. अनेकवेळा चहलनं पत्नी आणि कुटुंबासह मजेदार व्हिडिओ अपलोड करून चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. पण दोघांच्या एका गोष्टीमुळं चांगलीच चर्चा रंगली आहे.

धनश्रीनं चहल आडनाव काढून टाकलं!

आपल्या पोस्टमुळं चर्चेत असणारी धनश्री आणि चहलची जोडी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत आहे. काही काळापूर्वी धनश्री वर्मानं ‘चहल’ हे आडनाव आपल्या इंस्टाग्राम युजरनेममधून काढून टाकलं आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युजरनेम धनश्री वर्मा चहल असं होतं. मात्र अचानक तिनं चहल नाव दूर करून सर्वांनाच चकित केलं आहे. हे का घडलं याचा आत्ताच अंदाज लावता येत नाही, पण धनश्री आणि चहल यांच्यात काहीही चांगले चाललं नसल्याचा अंदाज चाहते सतत बांधत आहेत.

हेही वाचा – शेवटी विराट कोहलीनं केलं कबूल! म्हणाला, “आपल्याच माणसांनी भरलेल्या खोलीत मला…”

धनश्रीनंतर चहलच्या एका इंस्टाग्राम पोस्टनंही प्रश्न उपस्थित केले आहेत. चहलनं सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये लिहिलं होतं, ”एक नवीन जीवन सुरू होत आहे.” या पोस्टवरून लोकांनी आपले तर्क बांधण्यास सुरुवात केली आहे. या जोडप्याचं नक्की झालं काय, याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही.

दोघांची पहिली भेट!

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन क्लासदरम्यान झाली होती. खरंतर चहल धनश्री वर्माच्या क्लासमध्ये डान्स शिकायला जॉईन झाला होता, इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. यानंतर धनश्री आणि चहल यांनी २२ डिसेंबर २०२२ रोजी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला जवळपास दीड वर्षे उलटून गेली आहेत आणि जवळपास प्रत्येक क्रिकेट स्पर्धेत धनश्री तिच्या नवऱ्याला चिअर करायला नक्कीच येते. धनश्री डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट देखील आहे. तिचं नृत्याशी संबंधित एक यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलचे २६ लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. धनश्री बॉलीवूड गाणी रिक्रिएट करते.

हेही वाचा – दोन लिंबू आणि कोळसा खाऊन ‘तो’ त्या बेटावर ५ दिवस जिवंत राहिला!

चहलची कारकीर्द

युझवेंद्र चहलच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं, तर तो भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. २०१६ मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत ६४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १११ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० च्या ६२ सामन्यात त्याच्या नावावर ७९ विकेट आहेत. त्यानं आयपीएलच्या १३१ सामन्यात १६६ विकेट घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment