युवराज सिंग दुसऱ्यांदा बनला ‘बाप’, सोशल मीडियावर दिली Good News!

WhatsApp Group

Yuvraj Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने पत्नी हेजल कीचसोबत मुलगा आणि मुलगी दोघांचा फोटो शेअर केला आहे.

भारतीय संघाला 2011 मध्ये आयसीसी वनडे विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा युवराज सिंग दुसऱ्यांदा बाप बनला आहे. सोशल मीडियावर त्याने पत्नी हेजल कीच आणि मुलासोबत मुलीला आपल्या मांडीवर घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. राजकन्येच्या घरी येण्याने कुटुंब पूर्ण झाल्यामुळे तो किती आनंदी आहे हे त्याने सांगितले.

हेही वाचा – तुझो अभिमान वाटता गो..! चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशात रत्नागिरीच्या कन्येचा वाटा

कुटुंब आणि त्याच्या जवळच्या लोकांव्यतिरिक्त, फार कमी लोकांना माहीत होते की युवराज वडील होणार आहे. युवराज सिंगचा फोटो शेअर केल्यापासून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फोटो शेअर करताना युवराज सिंहने लिहिले की, जेव्हापासून छोटी राजकुमारी आमच्या घरी आली आहे, तेव्हापासून रात्री जागण्याची मजा आणखीनच मजेदार झाली आहे. हा अनुभव वेगळा आहे आणि आता कुटुंब पूर्ण झालेले दिसते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment