Yuvraj Singh Biopic : भारतीय क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक युवराज सिंगच्या जीवनावर एक चित्रपट बनणार आहे. खुद्द युवराज सिंगने त्याच्या बायोपिकवर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही एका पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. भारताच्या टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युवराजचा प्रवास खूपच छान होता. कॅन्सरशी लढा देऊन तो मैदानात परतला, ज्याने सर्वांना प्रेरणा दिली.
2007 च्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध सहा षटकार मारण्याचा पराक्रम असो किंवा 2011च्या आयसीसी वनडे विश्वचषकात सामना भारताकडे वळवण्याचा पराक्रम असो. बॅट आणि बॉल व्यतिरिक्त युवराज सिंगने क्षेत्ररक्षणातही अशी छाप सोडली की तरुण आजही फॉलो करतात. या महान क्रिकेटपटूच्या जीवनावर चित्रपट बनणार आहे. युवराज सिंगने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती देत चित्रपट निर्मात्याचे आभार मानले आहेत.
BIOPIC OF YUVRAJ SINGH IS COMING SOON….!!!!! 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) August 20, 2024
– It will be the celebration of his unparalleled journey & contribution to cricket. pic.twitter.com/bwOA0iyhDK
हेही वाचा – केकेआरच्या रिंकू सिंहची आयपीएलमध्ये ‘या’ टीमकडून खेळण्याची इच्छा!
युवराज सिंगच्या बायोपिकची निर्मिती भूषण कुमार-रवी भागचंदका करणार आहेत. या चित्रपटात युवीचे पात्र पडद्यावर कोण साकारणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. बॉलिवूडचा उगवता कलाकार सिद्धांत चतुर्वेदीने युवराज सिंगच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. युवराज सिंगचे पात्र पडद्यावर जिवंत करण्यासाठी रणवीर कपूर हा एक चांगला पर्याय असू शकतो. याआधी त्याने बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारली होती.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सुशांतने पडद्यावर धोनीची भूमिका अशा प्रकारे साकारली की लोक त्याला खऱ्या आयुष्यातही धोनीसारखाच मानू लागले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!