WWE सुपरस्टार जॉन सीना 8 तारखेला येणार भारतात!

WhatsApp Group

John Cena : भारतात WWE चा लाईव्ह इव्हेंट 8 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. तब्बल 7 वर्षानंतर भारताला WWE चे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. स्टार रेसलर जॉन सीनाही भारतात येत आहे ही चाहत्यांसाठी आनंदाची बाब आहे. WWE चा सर्वात लाडका सुपरस्टार जॉन सीना अखेर WWE मध्ये परतला आहे. तो नुकताच स्मॅकडाउनमध्ये दाखल झाला होता.

जॉन सीनाच्या संदर्भात एक पोस्ट शेअर करताना WWE ने लिहिले की, जॉन सीना 8 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. WWE ने जॉन सीनाचे अनेक फोटो सोबत पोस्ट केले आहेत. कोणत्याही WWE सुपरस्टारचे भारतात येणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असेल. कारण अनेक वर्षांनंतर हा कार्यक्रम भारतात आयोजित केला जात आहे. यामुळे भारतात कुस्तीलाही प्रोत्साहन मिळेल.

हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ आश्चर्यकारक गावात लोक सापांसोबत राहतात!

जॉन सीना शेवटचा एप्रिल 2023 मध्ये WWE मध्ये दिसला होता. भारतात येणार्‍या सुपरस्टार्सच्या यादीत सध्याचा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेठ रोलिन्स, महिला वर्ल्ड चॅम्पियन रिया रिप्ले, WWE टॅग टीम चॅम्पियन सामी झेन आणि केविन ओवेन्स यांचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment