WTC Final : पोरानं करून दाखवलं…! यशस्वी जयस्वालची टीम इंडियात एन्ट्री

WhatsApp Group

WTC Final Yashasvi Jaiswal : 21 वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल अखेर टीम इंडियात सामील झाला आहे. आयपीएल 2023 मध्ये या सलामीवीर फलंदाजाने शानदार कामगिरी करत शतक ठोकले. माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीपासून ते मोहम्मद कैफपर्यंत ते त्याला लवकरच टीम इंडियात स्थान देण्याबाबत बोलत होते. यशस्वी आता WTC फायनलसाठी इंग्लंडला जाणार आहे. आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयला सांगितले की, लग्नामुळे तो या काळात उपलब्ध होणार नाही. आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये CSKचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टायटन्स संघ ंगतविजेता आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून निवडकर्ते यशस्वीला इंग्लंडला पाठवत आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जयस्वालचा स्टँडबाय म्हणून टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. 3-4 जून रोजी लग्न होणार असल्याची माहिती ऋतुराजने बोर्डाला दिली आहे. संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. त्याच्याकडे आधीच व्हिसा आहे. अशा स्थितीत तो येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वीने आयपीएल 2023 मध्ये 14 डावात 625 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणी स्पर्धेतील 5 सामन्यात 404 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 80 आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final GT Vs CSK : पावसामुळे मॅच झाली नाही, तर ‘हा’ संघ ट्रॉफी नेणार!

ऋतुराज गायकवाडला बीसीसीआयने 7 जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलसाठी सलामीवीर स्टँडबाय म्हणून ठेवले होते. त्याने बोर्डाला कळवले होते की तो 5 जूननंतर संघात सामील होऊ शकतो, परंतु प्रशिक्षक राहुल द्रविडला त्याची जागा लवकर हवी होती. गायकवाड यांनी लग्नामुळे वेळेवर जाऊ शकणार नसल्याचे सांगितल्यामुळे यशस्वी जयस्वालला संघात स्थान देण्यात आल्याचे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रशिक्षक राहुल द्रविडने निवडकर्त्यांना त्याचा पर्याय विचारला. या कारणास्तव यशस्वीची निवड करण्यात आली.

कर्णधार रोहित आज होणार रवाना

कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन आज लंडनला रवाना होणार आहेत. सूर्यकुमार यादव 30 मे रोजी आयपीएल फायनलनंतर मोहम्मद शमी, शुभमन गिल आणि रवींद्र जडेजासह तेथे जाणार आहेत. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या संघातील अनेक खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. यामध्ये विराट कोहली, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, उमेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment