WTC Final : आयपीएलच्या 16व्या हंगामाच्या समाप्तीनंतर, क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यावर खिळल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे हा ब्लॉकबस्टर सामना अत्यंत काटेकोर होण्याची अपेक्षा आहे.
अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू सरावासाठी उतरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा देखील 30 मे (मंगळवार) रोजी संघात सामील झाला. असं असलं तरी हा अंतिम सामना रोहित शर्मासाठी खूप खास असणार आहे. रोहितला त्याच्या कर्णधारपदाखाली यावेळी मुंबई इंडियन्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नसली तरी आता WTC च्या अंतिम सामन्यात इतिहास रचण्याची संधी त्याच्याकडे आहे.
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
अंतिम सामन्यात रोहित शर्माने आपल्या संघाला ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून दिल्यास, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरेल. यासह, तो भारतीय संघाला त्याच्या नेतृत्वाखाली ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या निवडक कर्णधारांमध्ये सामील होईल. स्टार फलंदाज विराट कोहलीही त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी एकही आयसीसी विजेतेपद मिळवू शकला नाही. म्हणजेच रोहितला कर्णधार म्हणून आयसीसी ट्रॉफी जिंकून विराट कोहलीला पराभूत करण्याची संधी असेल.
हेही वाचा – Aadhar Card : तारीख जवळ येतेय…! फ्रीमध्ये अपडेट करा आधार कार्ड; जाणून घ्या!
अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढू शकते. रोहितला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 20.75 च्या सरासरीने केवळ 332 धावा करता आल्या. आता रोहितला ते अपयश विसरून अंतिम सामन्यात बॅटने दमदार खेळ दाखवायला आवडेल. रोहितच्या विपरीत, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. याशिवाय कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारानेही अलीकडच्या काळात काउंटी क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत आणि त्याला इंग्लिश परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे.
आयसीसी विजेतेपदाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षाही संपणार आहे. तसं पाहिलं तर भारतीय संघ दहा वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. शेवटच्या वेळी 2013 मध्ये, टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडचा पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने अनेक वेळा सेमीफायनल किंवा फायनल गाठली, पण विजेतेपद मिळवता आले नाही.
टीम इंडियाला 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक (2015) आणि टी-20 विश्वचषक (2016) च्या उपांत्य फेरीतही भारताचा पराभव झाला. भारताची चॅम्पियन्स ट्रॉफी (2017) आणि 2019 च्या विश्वचषकातही अशीच परिस्थिती होती. यानंतर 2021 आणि 2022 चा टी-20 विश्वचषकही भारतासाठी निराशाजनक ठरला. त्याच वेळी, 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
WTC फायनलसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाक, अक्षर पटेल, मोहम्मद ठाक शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!