WTC Final : भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाला तर ‘हा’ संघ होणार महाविजेता!

WhatsApp Group

WTC Final : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. उभय संघांमधील हा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे, तर ऑस्ट्रेलियन टीम पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. 2021 साली साउथम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान लंडनमधील हवामानावरही क्रिकेट चाहत्यांची नजर असेल. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी (9 आणि 10 जून) विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. एकूणच, पाच दिवसांच्या खेळादरम्यान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जे क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगले म्हणता येईल.

आयसीसीनेही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस (12 जून) ठेवला आहे. पहिल्या पाच दिवसांत पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे खेळ खराब झाल्यास हा राखीव दिवस वापरला जाईल. पाच दिवसांचा खेळ कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाला, तर राखीव दिवस वापरला जाणार नाही.

सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिला तर काय होईल?

जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. सामना बरोबरीत संपला तरी दोन्ही संघ संयुक्तपणे चॅम्पियन होतील. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनच सामने बरोबरीत संपले आहेत. 1960 मध्ये प्रथमच वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन कसोटी सामना झाला. त्यानंतर 1986 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई कसोटी सामना बरोबरीत संपला.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 च्या गुणतालिकेत, ऑस्ट्रेलियन संघाने 152 गुणांसह पहिले स्थान मिळवले आणि टीम इंडियाने (127 गुण) दुसरे स्थान मिळविले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. असं असलं तरी, दोन्ही संघांना एक प्रकारे अंतिम फेरीत जाण्याचा हक्कही होता कारण आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – धक्कादायक! चॉकलेट समजून लहान मुलाने साप तोंडात घालून चावला, मग पुढे….

WTC फायनलसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट , उमेश यादव, ईशान किशन (विकेटकीपर).

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघ 

पॅट कमिन्स (कप्तान), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर , स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

स्टँडबाय खेळाडू : मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment