WTC Final : टीम इंडियाने जिंकला टॉस, ‘या’ दिग्गज खेळाडूला बसवलं!

WhatsApp Group

WTC Final IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात आजपासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाशी स्पर्धा सुरू झाली आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर ही जेतेपदाची लढत होत आहे. टीम इंडिया तब्बल दशकभरानंतर आयसीसीचे जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरत आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात रवीचंद्रन अश्विनला संधी मिळालेली नाही. भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. त्याचवेळी अजिंक्य रहाणे बऱ्याच काळानंतर कसोटी सामना खेळत आहे. केएश भरत टीम इंडियाचा विकेटकीपर आहे. इशान किशनला संधी मिळालेली नाही.

हेही वाचा – PPF Scheme मध्ये पैसे टाकणाऱ्यांची मजा, सरकार देणार पूर्ण 42 लाख!

फायनलसाठी भारत-ऑस्ट्रेलियाची Playing 11

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment