WTC Final : मॅचमधून ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट, थोड्याच वेळात सुरू होणार फायनल!

WhatsApp Group

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवार 7 जूनपासून ओव्हल क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. या मेगा मॅचच्या पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की रोहित खेळतोय प्लेइंग 11 वर काय म्हणतो? तसेच, मंगळवारी सराव करताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, लोकांना त्याची उपलब्धता जाणून घ्यायची इच्छा होती. सध्या पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कर्णधाराने दुखापतीबाबत कोणतेही अपडेट दिले नसून तो चांगल्या स्थितीत दिसत होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सायकलचा (2021-23) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुपारी 3 पासून रंगेल. दोन्ही संघ प्रथमच ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करून 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्मासमोर पहिले आव्हान असेल ते प्लेइंग 11 निवडण्याचे. भारतीय संघात फलंदाजांची अडचण नाही, पण गोलंदाजांच्या निवडीवरून कर्णधार आणि प्रशिक्षक दोघांनाही कोडे सोडवावे लागू शकते. अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाच खेळाडूला संधी मिळणार आहे. त्याचवेळी उमेश यादव आणि जयदेव उनाडकटमधील एका खेळाडूला बाहेर बसावे लागणार आहे.

हेही वाचा – WTC Final : रोहित शर्मा खेळणार की नाही? फायलनच्या काही तासांपूर्वी आली ‘अशी’ बातमी!

शुबमन गिल आणि रोहित शर्मा भारतासाठी डावाची सुरुवात करणार आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजाराचे आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचे स्थान निश्चित झाले आहे. अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर खेळेल. रवींद्र जडेजाला सहाव्या क्रमांकावर संधी मिळेल. अशा परिस्थितीत केएस भरत किंवा इशान किशनला सातव्या क्रमांकावर संधी दिली जाईल. या सामन्यात भरत खेळेल अशी शक्यता आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची जागा निश्चित झाली आहे, मात्र तिसर्‍या वेगवान गोलंदाजासाठी उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यात लढत आहे. त्याचबरोबर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी पाचवा गोलंदाज म्हणून निवड करणे कठीण होईल.

ऑस्ट्रेलिया दुखापतीमुळे त्रस्त

कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघही दुखापतीने हैराण झाला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड हा सामना खेळणार नाही. अशा स्थितीत स्कॉट बोलँडला संधी मिळण्याची खात्री आहे. वॉर्नर-ख्वाजा जोडी ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात करेल. यानंतर, मधल्या फळीत लाबुशेन, स्मिथ, हेड आणि ग्रीन यांची जागा निश्चित झाली आहे. विकेटकीपिंगची जबाबदारी अॅलेक्स कॅरीवर असेल. मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड हे वेगवान गोलंदाज म्हणून कर्णधार कमिन्ससोबत खेळतील. त्याचबरोबर नॅथन लायन हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment