WTC Final 2023 IND vs AUS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाची संपूर्ण मॅच फी कापली आहे. सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनल्यानंतर आनंद साजरा करणाऱ्या ऑस्ट्रेलियालाही मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मॅच फीमधील 80 टक्के कपात केली आहे.
अंतिम सामन्यादरम्यान, दोन्ही संघांनी बहुतेक षटके त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी केली. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही दिवशी पूर्ण 90 षटके खेळता आली नाहीत. या सामन्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. भारतीय खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के तर ऑस्ट्रेलियाला 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतीय संघ वेळापत्रकानुसार पाच षटके मागे होता, तर ऑस्ट्रेलियन संघ चार षटके मागे होता. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार, संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही तर खेळाडूंना टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. पाच षटके मागे राहिल्याने भारतीय संघाची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
🚨 JUST IN: India, Australia and star opener sanctioned by the ICC.
Details ⬇️https://t.co/n1AVCUeVTm
— ICC (@ICC) June 12, 2023
हेही वाचा – World Cup 2023 : ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान मॅच, टीम इंडियाचं शेड्युल जाहीर!
शुबमन गिलला 115 टक्के दंड
भारताच्या शुभमन गिलला कसोटीच्या चौथ्या दिवशी बाद करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर टीका केल्याबद्दल आणखी एक दंड भरावा लागणार आहे. गिलने ICC कलम 2.7 चे उल्लंघन केले आहे, जे आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका किंवा अयोग्य टिप्पणीशी संबंधित आहे. शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. संघाच्या संथ ओव्हर-रेट आणि त्याला बाद करण्याच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल गिलला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे, एकूण दंड त्याच्या मॅच फीच्या 115 टक्के इतका आहे. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या मॅच फीच्या 15 टक्के आयसीसीला भरावे लागतील आणि कोणत्याही भारतीय खेळाडूला या सामन्याची फी मिळणार नाही. दूरदर्शन पंच रिचर्ड केटलबरो यांनी कॅमरून ग्रीनचा झेल निष्पक्ष मानून गिलला बाद ठरवले. यावर गिलने इंस्टाग्रामवर पंचांच्या निर्णयावर टीका केली. या कारणास्तव त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात 234 धावा केल्या आणि सामना 209 धावांनी गमावला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!