WTC Final 2023 : आई गं…! भारताच्या खेळाडूचा हात मोडता मोडता वाचला, पाहा Video

WhatsApp Group

WTC Final 2023 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळला जात आहे. जिथे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर टीम इंडिया फक्त पहिला डाव खेळत आहे. भारतानेही 151 धावांत 5 विकेट गमावल्या आहेत. सध्या अजिंक्य रहाणे आणि केएस भरत क्रीजवर उभे आहेत. जे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मोठ्या कष्टाने सामना करत आहेत. यादरम्यान केएस भरतलाही किरकोळ दुखापत झाली.

मिचेल स्टार्कच्या जीवघेण्या गोलंदाजीबद्दल कोणाला माहिती नाही? तो ऑस्ट्रेलियाच्या आवडत्या गोलंदाजांपैकी एक आहे हे सर्वांना माहीत आहे.  38व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केएस भरतने स्ट्राईक घेतली. मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. त्याने इतका वेगवान गोलंदाजी केली की चेंडू थेट केएस भरतच्या कोपरावर आदळला. चेंडूचा वेग खूप जास्त होता. दुखापतीनंतर लगेचच वैद्यकीय पथकही मैदानावर पोहोचले.

हेही वाचा – VIDEO : लेडी कॉन्स्टेबलच्या साहसाला सलाम, रेल्वे ट्रॅकवर जीव देणाऱ्याला वाचवलं!

चेंडू कोपरावर आदळल्यानंतर चेंडू बाऊंड्रीकडे खूप वेगाने जात होता. मात्र डेव्हिड वॉर्नरने त्याला रोखण्यात यश मिळवले. चेंडू कोपरावर आदळल्यानंतर भरत थोडा घाबरलेला दिसत होता. त्या दुखापतीचा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. भरतसमोर स्वत:ला  सिद्ध करण्‍याची एक उत्तम संधी आहे. त्याला आगामी सामन्यांमध्ये टिकायचे असेल तर त्याला चांगली कामगिरी करावी लागेल.

टीम इंडियाने पहिल्या डावात अतिशय वेगाने विकेट गमावली, रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा हे सर्व फ्लॉप झाले. रवींद्र जडेजा 48 धावा करू शकला. पण शेवटी त्याने आपली विकेट नॅथन लायनला दिली. आता जबाबदारी अजिंक्य रहाणे आणि केएस भरत यांच्यावर आहे. या दोन्ही खेळाडूंना टीम इंडियाच्या आगामी सामन्यांसाठी आपला दावा मांडायचा आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment