WTC Final 2023 : अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो, उडवले तिन्ही स्टम्प्स! पाहा जबरदस्त रनआऊट

WhatsApp Group

WTC Final 2023 Axar Patel Run Out : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा दुसरा दिवस सुरू असून टीम इंडियाने पहिल्या दिवसाची पूर्ण तयारी केली आहे. स्टीव्ह स्मिथने फायनलच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात शतक पूर्ण केले, पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मोहम्मद शमी आणि सिराज यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. दुसऱ्या दिवशीही सिराजने पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी आपलं काम केलं. यानंतर असा चमत्कार घडला की कोणालाच काही कळले नाही.

फायनलमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने घोषित केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एका फिरकीपटूला संधी देण्यात आली होती. तो रवींद्र जडेजा होता. ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट होईपर्यंत रवींद्र जडेजाला एकही विकेट मिळाली नाही, ही आणखी एक बाब आहे. म्हणजेच रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलला बाहेर बसावे लागले. पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अक्षर पटेल अचानक मैदानात आला.

हेही वाचा – भारतात होणार मिस वर्ल्ड स्पर्धा, 130 देशांच्या सुंदरी येणार!

मोहम्मद शमी काही काळासाठी मैदानाबाहेर गेला जागी अक्षर पटेल क्षेत्ररक्षणासाठी आला. त्याने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. षटकातील पाचव्या चेंडूवर मिचेल स्टार्कने चेंडू मिड-विकेटच्या दिशेने खेळला आणि एकेरी धाव घ्यायचा प्रयत्न केला, पण अक्षर पटेलने एका हाताने चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकिंग एंडला फेकून दिला, स्टार्क क्रीझवर येण्यापूर्वी अक्षर पटेलने त्याला धावबाद केले होते.

ऑस्ट्रेलियाने केल्या 469 धावा

ट्रॅव्हिस हेड (163) आणि स्टीव्ह स्मिथ (121) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर स्कोअरबोर्डवर 469 धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या 327/3 या धावसंख्येपुढे खेळणाऱ्या कांगारू संघाने आज 142 धावांत आपले शेवटचे सात फलंदाज गमावले. भारताकडून मोहम्मद सिराजने चार तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेट आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment