“ओपनिंग करणं सोप्प नाय….”, विराट कोहलीकडून रोहित शर्माची पोटभरून स्तुती!

WhatsApp Group

Virat Kohli On Rohit Sharma : लंडनमधील ओव्हल मैदानावर आज, 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळवला जात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सध्या भारताच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची छाप पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, स्टार क्रिकेटर विराट कोहलीने रोहित शर्माचे जोरदार कौतुक केले आहे.

विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांत त्याने कसोटीत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे ती शानदार आहे. आयसीसीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विराट म्हणाला, ”रोहित शर्मा हा खास खेळाडू आहे. मी नेहमी म्हणत आलो की रोहितकडे शॉट्स खेळण्यासाठी इतर कोणापेक्षा जास्त टायमिंग आहे आणि पहिल्या दिवसापासूनच त्याच्याकडे ही खास क्षमता होती. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा खेळताना पाहिले तेव्हा मला समजले की त्याचे इतके कौतुक का केले जाते आणि त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारतासाठी दीर्घ कालावधीत काय केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, ते त्याच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या स्वभावाची साक्ष देते.”

हेही वाचा – WTC Final 2023 : उमेश यादवने एकाच षटकात खाल्ले 4 चौकार, वॉर्नरची टी-20 बॅटिंग!

रोहित शर्मा आपला फॉर्म कायम ठेवेल अशी आशा विराटने व्यक्त केली आणि तो म्हणाला, ”ओपनिंग करणे सोपे काम नाही आणि त्याने आमच्यासाठी डावाची सुरुवात करून शानदार कामगिरी केली. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याला पाहण्यात आनंद आहे, विशेषत: दुसऱ्या टोकाकडून, आणि आशा आहे की त्याने ओव्हलमध्ये गेल्या वेळी जे केले होते त्याची पुनरावृत्ती करू शकेल.”

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द

रोहितने यावर्षी चार कसोटी सामने खेळले आणि 40.33 च्या सरासरीने 242 धावा केल्या. त्याने यंदा शतक झळकावले. एकूणच, रोहितने 49 सामन्यांमध्ये 45.66 च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. त्याने नऊ शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment