WTC Final : रोहित शर्मावर सुनील गावसकर नाखूष, कॉमेंट्रीदरम्यान काढला राग!

WhatsApp Group

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील स्पर्धा सुरू झाली आहे. अंतिम फेरीत नाणे रोहित शर्माच्या बाजूने पडले आणि त्याने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्यांनी आपला राग काढला. त्यांनी प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केले आहेत.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. प्लेइंग 11 मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही. अश्विन टीम इंडियासाठी कसोटीत विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे ​​मोलाचे योगदान आहे. अश्विनच्या गैरहजेरीवर सुनील गावसकर यांनी कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित केला आहे.

हेही वाचा – “ओपनिंग करणं सोप्प नाय….”, विराट कोहलीकडून रोहित शर्माची पोटभरून स्तुती!

प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर म्हणाले, ”अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता.” सुनील गावसकर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.

फायनलबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी निराशा केली. ऑस्ट्रेलियाने 70 षटकात 3 बाद 265 धावा केल्या. ट्रॅविस हेडने तुफानी शतक ठोकले, तर स्टीव्ह स्मिथ शतकाकडे कूच करत आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment