WTC Final 2023 : स्टीव्ह स्मिथचे ‘क्लासिक’ शतक, तब्बल 19 चौकारांची आतषबाजी!

WhatsApp Group

WTC Final 2023 Steve Smith Hundred : भारताविरुद्धच्या जागतिक विश्व कसोटी चॅम्पियनशिप सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची दमदार कामगिरी दुसऱ्या दिवशीही कायम आहे. दुसऱ्या दिवसाचे पहिले षटक मोहम्मद सिराजने टाकले. मोहम्मद सिराजच्या दोन चेंडूंत लागोपाठ दोन चौकार मारून स्टीव्ह स्मिथने आपले शतक पूर्ण केले. त्याने 19 चौकारांसह 121 धावा केल्या.

स्मिथचे 31 वे शतक

स्टीव्ह स्मिथने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपली स्थिती मजबूत केली आहे. भारताला सामन्यात टिकायचे असेल, तर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जास्तीत जास्त विकेट्स घ्याव्या लागतील.

भारताविरुद्ध 9वे शतक

स्टीव्ह स्मिथला भारताविरुद्ध धावा करणे आवडते. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 9 शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. स्मिथ व्यतिरिक्त फक्त जो रूटची भारताविरुद्ध 9 शतके आहेत. स्टीव्ह स्मिथने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध आपले 31 वे कसोटी शतक झळकावले.

हेही वाचा – Gold Silver Price Today : आज स्वस्तात खरेदी करा सोनं, 10 ग्रॅमसाठी मोजा ‘इतके’!

ट्रॅव्हिसने अवघ्या 174 चेंडूत 25 चौकार आणि 1 षटकारासह 163 धावा केल्या. हेडने मोहम्मद शमीच्या चेंडूवर चौकार मारून 150 धावा पूर्ण केल्या. ट्रॅव्हिस हेड फलंदाजीला आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गडी गमावून 76 धावसंख्या होती. पण हेड आणि स्मिथच्या जोडीने सामन्याचा मार्ग पूर्णपणे बदलून टाकला.

ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत

या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत झाली आहे. भारतासाठी आता या सामन्यात पुनरागमन करणे अत्यंत कठीण दिसत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी आपला डाव वेगाने पुढे नेण्याचे काम केले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment