WTC Final 2023 : शुबमन गिलची विकेट ढापली? टीम इंडियासोबत चीटिंग? पाहा Video

WhatsApp Group

WTC Final 2023 Shubman Gill Wicket Controversy : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (IND vs AUS) दुसऱ्या डावात वादग्रस्तरित्या बाद झाला. थर्ड अंपायरचा हा निर्णय पाहून टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही नाराजी व्यक्त केली आहे. चौथ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपूर्वी गिल स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला.

स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर शुबमन गिलचा गलीत कॅमेरून ग्रीनकडे झेल घेतला. चेंडू जमिनीला स्पर्श झाला होता. पण थर्ड अंपायरने आऊट घोषित केले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबभमन गिल यांना थर्ड अंपायरच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर निराशा होती.

गिल बाद झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागने ट्वीट केले. सेहवागने सोशल मीडियावर मीमद्वारे आपले मत मांडले.

फायनलमध्ये कॉमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंगनेही चहाच्या ब्रेकदरम्यान शुबमन गिल नाबाद असल्याचे सांगितले. जेव्हा तंत्रज्ञान तुमच्याकडे उपलब्ध आहे तेव्हा तुम्ही त्याचा पुरेपूर वापर का केला नाही, असे भज्जीने सांगितले.

हेही वाचा – आईच्या प्रेमाखातर मुलाने बांधला दुसरा ताजमहाल! करोडो रुपये केले खर्च

आठव्या षटकात…

ही घटना टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील 8व्या षटकात घडली. वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने या षटकातील पहिला चेंडू गुड लेंथवर केला. गिलने बचाव करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटच्या बाहेरच्या कडेवरर गेला आणि कॅमेरून ग्रीन तयार असलेल्या गलीत गेला. डायव्हिंग करताना ग्रीनने एका हाताने झेल घेतला. थर्ड अंपायरने नंतर अनेक वेळा रिप्लेमध्ये कॅच पाहिला. तिसर्‍या पंचांनी सांगितले की ग्रीनचे बोट चेंडूखाली होते तर कॅमेऱ्याच्या कोणत्याही कोनात ते स्पष्टपणे दिसत नव्हते. असे असूनही, अंपायरने गिलला आऊट घोषित केले. ओव्हलमध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांनीही चीटर चीटरचा जयघोष सुरू केला.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 8 बाद 270 धावांवर घोषित केला आणि भारताला विजयासाठी 444 धावांचे मोठे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 173 धावांची मोठी आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाने 4 बाद 123 धावांवरून दिवसाची सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी उपाहारानंतर एक तासापूर्वी 147 धावा जोडल्या. अॅलेक्स कॅरी हा ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक धावा करणारा ठरला. त्याने 66 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment