WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी का बांधलीय? जाणून घ्या!

WhatsApp Group

WTC Final 2023 : लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू हाताच्या दंडाला काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले होते. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ही काळी पट्टी बांधली आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा यांनाही इंग्लंडमधील ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती कळताच तेही आतून हादरले. फायनलमध्ये पहिला चेंडू टाकण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एक मिनिटाचे मौनही पाळले.

288 जणांचा मृत्यू

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताला 110 तास उलटले तरी अद्याप 83 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ज्या 205 मृतदेहांची ओळख पटली आहे ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. जखमींपैकी 900 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 200 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी भारतीय रेल्वेने वर्तमानपत्रात जाहिराती देऊन सर्वसामान्यांची मदत घेतली आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर, खरीप पिकांच्या MSP बाबत सरकारचा ‘असा’ निर्णय!

अश्विन, इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

रवीचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. अंतिम 11 मध्ये भारताने 4 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकीपटूला संधी दिली. भारताचे 4 गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्या खांद्यावर आता संपूर्ण जबाबदारी आहे. त्याचवेळी, इशान किशन आणि केएस भरत यांच्या निवडीबाबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. अंतिम 11 साठी व्यवस्थापनाने भरतवर विश्वास दाखवला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment