WTC Final 2023 : मोहम्मद सिराजचा ‘वॉबल बॉल’, फलंदाज शून्यावर बाद! पाहा Video

WhatsApp Group

WTC Final 2023 IND vs AUS Mohammed Siraj : प्रतीक्षा संपली आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. ओव्हलच्या ऐतिहासिक मैदानावरून प्रथमच विजेत्या संघाच्या घरी ट्रॉफी जाईल. रोहित शर्माच्या संघाला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी हे विजेतेपद मायदेशात आणून स्वतःला सिद्ध करायचे आहे. गेल्या वेळी टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता आणि उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिले यश मिळवून दिले. वेगवान गोलंदाज सिराजने चौथ्या षटकात पहिली विकेट मिळवली. त्याने चौथा चेंडू वॉबल सीमने टाकला, जो उस्मान ख्वाजाला कळला नाही. चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन केएस भरतच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला. तो खाते न उघडताच बाद झाला. त्याने एकूण 10 चेंडू खेळले.

हेही वाचा – WTC Final 2023 : भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हाताला काळी पट्टी का बांधलीय? जाणून घ्या!

त्यानंतर मार्नस लाबुशेनला सिराज सतावताना दिसला. वेगवान खेळपट्टीचा फायदा घेत, सिराजने आखुड टप्प्याचा बॉल टाकला ज्यावर लाबुशेनच्या हाताला दुखापत झाली.

दोन्ही संघांची Playing 11

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment