WTC Final 2023 : …आणि मार्नस लाबुशेनची झोपच उडाली! नक्की काय घडलं? पाहा Video

WhatsApp Group

WTC Final 2023 Marnus Labuschagne :ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी भारताचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या त्यामुळे त्यांच्याकडे 173 धावांची आघाडी आहे. भारताकडून अजिंक्य रहाणेने 89 तर शार्दुल ठाकूरने 51 धावांचे योगदान दिले, दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने तीन तर स्कॉट बोलँड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेतले.

भारताचा पहिला डाव गुंडाळल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. तीन षटकांपर्यंत सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा जोरदार सामना केला, मात्र चौथ्या षटकात डेव्हिड वॉर्नरने आपली विकेट मोहम्मद सिराजकडे सोपवली. वैयक्तिक 1 धावांवर वॉर्नर विकेटच्या मागे झेलबाद झाला. वॉर्नरची विकेट पडताच डगआऊटमध्ये अशी मजेशीर घटना पाहायला मिळाली, ज्याने सगळे हसले.

हेही वाचा – WTC Final 2023 : एक नंबर कॅच! कॅम ग्रीनने घेतला रहाणेचा सुपर झेल; पाहा Video

खरेतर, वॉर्नर आणि ख्वाजा जेव्हा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा मार्नस लाबुशेन पॅड घालून डगआउटमध्ये झोपलेला दिसला. भारताच्या फलंदाजीच्या वेळी, लाबुशेनने चांगले क्षेत्ररक्षण केले, परिणामी थकवा आल्याने तो त्याच्या फलंदाजीची वाट पाहत असताना डगआउटमध्ये झोपी गेला. यादरम्यान वॉर्नरची विकेट पडताच लाबुशेनची झोप उडाली. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, गाढ झोपेत असताना, लाबुशेन घाईघाईने उठून ग्लोव्ह्ज आणि बॅट उचलताना दिसत आहे.

जेव्हा लाबुशेन खेळपट्टीवर पोहोचला तेव्हा असे वाटले की तो अजूनही झोपलेला आहे. यानंतर सिराजने असा चेंडू टाकला, ज्याचा लाबुशेनला अचूक अंदाज आला नाही आणि चेंडू त्याच्या बोटांना लागला. चेंडू लागताच बॅट लाबुशेनच्या हातातून सुटली आणि वेदनेने ओरडू लागला. हे दृश्य पाहिल्यानंतर सिराजच्या या बॉलने त्याला झोपेतून पूर्णपणे जागे केल्याचा भास झाला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment