WTC Final 2023 IND vs AUS : लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला. 444 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत विजयासाठी अखेरच्या दिवशी दोन्ही संघ जीव मुठीत धरून लढत आहेत. मात्र, त्याआधी फायनल मॅचचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंपायर हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ खेळाच्या तिसऱ्या दिवसाचा आहे.
खरं तर, तिसऱ्या दिवशी जेव्हा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी करत होता, त्यादरम्यान काही लोक साइड स्क्रीनवर आले. त्यानंतर स्मिथने मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर रिचर्ड इलिंगवर्थने प्रेक्षकांना हात जोडून निघण्यास सांगितले. यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला.
— No-No-Crix (@Hanji_CricDekho) June 9, 2023
ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथला दुसऱ्या डावात काही अप्रतिम कामगिरी करता आली नाही, पण पहिल्या डावात त्याने शानदार शतक झळकावले. पहिल्या डावात स्मिथने 268 चेंडूत 121 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात स्मिथला केवळ 34 धावा करता आल्या.
हेही वाचा – WTC Final 2023 : कसोटी मॅचच्या 5व्या दिवशी विराट कसा खेळतो? हा बघा रेकॉर्ड!
भारताला 444 धावांचे लक्ष्य
WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 469 धावा केल्या. मात्र, याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 270 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे दोन्ही डाव एकत्र करून ऑस्ट्रेलियाला 443 धावांची आघाडी मिळाली.
सामन्याचा निकाल आता पाचव्या दिवशी लागणार आहे. शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 280 धावा करायच्या आहेत, त्याच्या 7 विकेट्स शिल्लक आहेत, तर ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनायचे असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत 7 विकेट्स घ्याव्या लागतील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!