WTC Final 2023 : भारताचा अर्धा संघ तंबूत, जडेजा-रहाणेचा लढाऊ बाणा!

WhatsApp Group

WTC Final 2023 Day 2 Stumps : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ (8 जून) संपला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारताने 5 बाद 151 धावा केल्या. भारत अजूनही 318 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताचा पहिला डाव

भारतीय संघाने 30 धावांवर दोन विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बळी बनवले. रोहित 15 धावांवर पायचीत झाला. यानंतर पुढच्याच षटकात स्कॉट बोलँडने शुबमन गिलला क्लीन बोल्ड केले. गिलने 13 धावा केल्या. भारतीय संघाला 50 धावांवर तिसरा मोठा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजारा कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पुजाराला केवळ 14 धावा करता आल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी 71 धावांची भागीदारी केली. जडेजाने 48 धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर रहाणे 29 तर केएस भरत 5 धावांवर नाबाद आहे.

हेही वाचा – WTC Final 2023 : अक्षर पटेलचा रॉकेट थ्रो, उडवले तिन्ही स्टम्प्स! पाहा जबरदस्त रनआऊट

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 469 धावा

ट्रॅव्हिस हेड (163) आणि स्टीव्ह स्मिथ (121) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर स्कोअरबोर्डवर 469 धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या 327/3 या धावसंख्येपुढे खेळणाऱ्या कांगारू संघाने आज 142 धावांत आपले शेवटचे सात फलंदाज गमावले. भारताकडून मोहम्मद सिराजने चार तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेट आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment