WTC Final IND vs AUS Day 1 Stumps : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विनला न खेळवणे रोहितला महागात पडले आहे. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 327 धावा अशी भक्कम धावसंख्या उभारली आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांना चांगली सुरुवात करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ख्वाजाला खातेही खोलू दिले नाही. त्यानंतर वॉ़र्नरने 8 चौकारांसह 43 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला लाबुशेन (26) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ट्रेविस हेडने स्टीव्ह स्मिथसोबत द्विशतकी भागीदारी केली. हेडने शतक ठोकले. त्याने 22 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 146 धावा केल्या. तर स्मिथ 14 चौकारांसह 95 धावांवर नाबाद आहे.
Day one belongs to Australia!
Travis Head and Steve Smith unbeaten at the close #WTCFinal
— cricket.com.au (@cricketcomau) June 7, 2023
हेही वाचा – WTC Final : रोहित शर्मावर सुनील गावसकर नाखूष, कॉमेंट्रीदरम्यान काढला राग!
दोन्ही संघांची Playing 11
ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!