

WTC Final 2023 : लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवला संधी दिली आहे. पण उमेशने त्याच्या दुसऱ्या षटकात 16 धावा खाल्ल्या.
उस्मान ख्वाजाच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसल्यानंतर टीम इंडियाने दबाव टाकण्यास सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनीही सावध पवित्रा घेतला. मात्र 15वे षटक उमेश यादवने टाकले आणि ऑस्ट्रेलियाने दबाव घालवला. वॉर्नरने उमेशला 4 चौकार ठोकले.
हेही वाचा – WTC Final 2023 : मोहम्मद सिराजचा ‘वॉबल बॉल’, फलंदाज शून्यावर बाद! पाहा Video
याआधी 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना झाला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला होता. टीम इंडियाने गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने 2021 मध्ये शेवटचे आयसीसी विजेतेपद जिंकले. संघाने आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला. सामना जिंकणारा संघ पुढे प्रत्येक आयसीसी विजेतेपद जिंकणारा संघ बनेल.
दोन्ही संघांची Playing 11
ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!