WTC Final 2023 Cameron Green Catch : लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC चा विजेतेपद सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी भारत पहिल्या डावात 296 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या, त्यामुळे त्यांना 173 धावांची आघाडी मिळाली होती. भारताकडून अजिंक्य रहाणेने 89 तर शार्दुल ठाकूरने 51 धावांचे योगदान दिले. दोघांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने तीन तर स्कॉट बोलँड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेतले.
ग्रीनचा भन्नाट कॅच
तिसऱ्या दिवशी भारताला केएस भरत (5) च्या रुपात लवकर धक्का बसला. स्कॉट बोलँडने त्याला बोल्ड केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या सत्रानंतर रहाणे बाद झाला. पॅट कमिन्सचा आखुड टप्प्याचा फटका खेळताना रहाणेच्या बॅटची कड लागली. कॅमरून ग्रीनने चपळाईने हवेत सूर मारत हा झेल टिपला.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्याचं सोडाच, आता चांदीच्याही दरात उसळी! वाचा आजचे रेट
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 469 धावा
ट्रॅव्हिस हेड (163) आणि स्टीव्ह स्मिथ (121) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावल्यानंतर स्कोअरबोर्डवर 469 धावा केल्या. पहिल्या दिवसाच्या 327/3 या धावसंख्येपुढे खेळणाऱ्या कांगारू संघाने आज 142 धावांत आपले शेवटचे सात फलंदाज गमावले. भारताकडून मोहम्मद सिराजने चार तर मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाच्या खात्यात एक विकेट आली.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!