Wriddhiman Saha : भारताचा जबरदस्त विकेटकीपर आणि चांगला आयपीएल ओपनर रिटायर!

WhatsApp Group

Wriddhiman Saha Retirement : भारताचा जबरदस्त विकेटकीपर आणि चांगला आयपीएल ओपनर वृद्धिमान साहा याने सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामानंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. बंगालकडून खेळणाऱ्या साहाने आपल्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. 40 वर्षीय साहाने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. तो 2021 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. साहा आयपीएल 2025 मध्येच सहभागी होणार नाही. त्याने मेगा लिलावासाठी आपले नाव दिलेले नाही, असे वृत्त आहे.

बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यासाहाने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. त्याने लिहिले, ‘क्रिकेटमधील एका सुंदर प्रवासानंतर, हा सीझन माझा शेवटचा असेल. बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला आहे, मी निवृत्त होण्यापूर्वी फक्त रणजी ट्रॉफी खेळणार आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार. चला हा हंगाम संस्मरणीय बनवूया.”

हेही वाचा – भारतीय रेल्वेमध्ये ‘मोठा’ बदल! आता ‘या’ अपवर होणार तिकीट बुकिंग, जाणून घ्या

साहा 2007 पासून बंगालकडून खेळत आहे. 2022 मध्ये ते त्रिपुराला गेला. दोन वर्षे त्रिपुराचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, तो 2024 मध्ये शेवटच्या वेळी बंगालसाठी खेळण्यासाठी परतला. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामातील तीन पैकी दोन फेऱ्या तो खेळला आहे. साहा पहिल्या फेरीत यूपीविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाला आणि तिसऱ्या फेरीत केरळविरुद्धच्या संघाच्या एकमेव डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment