World Cup 2023 : न्यूझीलंड संघावर कोसळला दुःखाचा डोंगर!

WhatsApp Group

Kane Williamson Injury Update In Marathi : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) थरार पाहायला मिळत आहे. न्यूझीलंड संघाने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. मात्र स्पर्धेच्या निर्णायक वळणावर किवी संघावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 13 ऑक्टोबरला दुखापतीतून पुनरागमन करणारा केन विल्यमसन दुर्दैवाने पुन्हा दुखापतीचा बळी ठरला आहे. त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार दुखापतीमुळे विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यांपासून विश्रांतीवर होता. मात्र तिसऱ्या सामन्यात तो परतल्याने संघ आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. पण परत येताच त्याने शानदार अर्धशतक झळकावले. विल्यमसन 78 धावांवर फलंदाजी करत असताना तो क्षेत्ररक्षकाच्या धोकादायक थ्रोचा बळी ठरला. त्यामुळे तो सामन्याच्या मध्यात दुखापतग्रस्त होऊन रिटायर्ड हर्ट झाला. आता त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.

कमबॅक करणार? (Kane Williamson Injury)

केन विल्यमसन (Kane Williamson News In Marathi) आयपीएलमध्ये झालेल्या गंभीर दुखापतीतून तो आधीच सावरला होता. त्याने बांगलादेशविरुद्ध 78 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. पण दुखापतीनंतर त्याचे पुनरागमन फार कठीण वाटते. न्यूझीलंडला आपला पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 18 ऑक्टोबरला खेळायचा आहे आणि फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याच्या जागी एका बॅकअप खेळाडूला बोलावण्यात आले आहे. विल्यमसनच्या जागी टॉम लॅथम कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याच वेळी, टॉम ब्लंडेलला बॅकअप खेळाडू म्हणून बोलावण्यात आले आहे.

केन विल्यमसन दुखापतीशी झुंजत असला तरी त्याचा फॉर्म खूपच धोकादायक दिसत आहे. विश्वचषकातील सराव सामन्यांमध्येही विल्यमसनने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्याचवेळी दुखापतीतून परत येताच त्याने 78 धावा केल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment